जळगाव :निवडणुकीसाठी जाहीर करण्यात येणारी अंतिम मतदार यादी आता ५ जानेवारीऐवजी आता २२ जानेवारीला प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे दुबार नावे वगळणे तसेच मयतांची नावे वगळणे या कामासाठी १५ दिवसांचा अतिरिक्त अवधी मिळणार असून, नवमतदारांनादेखील नाव नोंदणीची पुन्हा संधी मिळणार आहे. नावे वगळल्याने मतदार यादीचे शुद्धीकरण होण्यास मदत होणार आहे.
राज्यात असे नऊ लाख अर्ज आले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्दे शानुसार २७ ऑक्टोबरला राज्यात प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर नव मतदारांना नोंदणी तसेच मयत व दुबार नावे वगळणे, मतदान कार्ड, पत्त्यात दुरुस्ती अशा काम ांसाठी ९ डिसेंबरची मुदत देण्यात आली होती. या अर्जावर २६ डिसेंबरपर्यंत करण्यात आली. कार्यवाही मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह देशातील १२ राज्यांमध्ये ही मुदत आता १२ जानेवारी अशी केली आहे, तर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी २२ जानेवारी ही तारीख निश्चित केली आहे.
पूर्वी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीख ५ जानेवारी ठरवण्यात आली होती.याबाबत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ९ ते २६ डिसेंबर या काळात मतदार नोंदणी दुबार नावे, तसेच त्यामधील बदल कार्डातील दुरुस्ती ही कामे करण्यात आली. या कामासाठी आता १२ जानेवारी अशी मुदतवाढ देण्यात आली आहे. यादरम्यान दुबार नावे, तसेच मयतांची नावे वगळणे हे काम प्रामुख्याने करण्याचे निर्देश सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यासोबतच नवमतदारांनादेखील नोंदणीसाठी नव्याने संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादी आता ५ जानेवारीऐवजी २२ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. परिणामी अंतिम मतदार यादीत नव्याने मतदारांची संख्या वाढणार आहे.