देशातील सर्वात मोठ्या निवडणुकीचे म्हणजेच लोकसभा निवडणुकीचे निकाल उद्या म्हणजेच ४ जून रोजी येणार आहेत. भाजप प्रणीत एनडीए आणि इंडिया आघाडी असा थेट सामना या निवडणुकीत होत आहे. ७ टप्प्यात झालेल्या या निवडणुकीनंतर देशातील जनतेचे लक्ष स्थापन होणाऱ्या नव्या सरकारकडे लागले आहे. १ जून रोजी आलेल्या एक्झिट पोलने हे चित्र बऱ्याच अंशी स्पष्ट केले असले तरी तो अंतिम निकाल नाही. त्यामुळे मंगळवारी येणार निकाल हा महत्वाचा ठरणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. आधी पोस्टल बॅलेटची मोजणी केली गेली.
पोस्टल मतपत्रिकेची दोन गटात मतमोजणी झाली. पहिल्या गटात लष्कर, निमलष्करी दलाचे जवान आणि अधिकारी यांच्या मतांची तर दुसऱ्या गटात निवडणूक कर्तव्य बजावणारे कर्मचारी, अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची पोस्टल मतमोजणी झाली. त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणीला सुरवात होईल.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाबरोबरच आंध्र प्रदेश आणि ओडिशा विधानसभा निवडणुकांची मतमोजणीचे निकालही ४ जून रोजी जाहीर होणार आहेत. दुपारी दोन वाजेपर्यंत निकालाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. ईव्हीएममधील चे व्हीव्हीपीएटी सह जुळल्यानंतर व्हीव्हीपीएटी स्लिप मोजणी आणि पोस्टल मतपत्रिका जोडल्यानंतर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सर्व जागांवर निकाल घोषित होतील असा अंदाज आहे.