लोकसभा निवडणूक 2024 कधी होणार? या प्रश्नावर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिले उत्तर

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवारी (१७ फेब्रुवारी) सांगितले की, २०२४ च्या संसदीय निवडणुका आणि राज्य विधानसभा निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोग पूर्णपणे तयार आहे आणि सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.

काय म्हणाले मुख्य निवडणूक आयुक्त?
राजीव कुमार म्हणाले, “मी निवडणूक आयोगाच्या वतीने आणि तुमच्या  सांगू इच्छितो की आम्ही 2024 च्या संसदीय निवडणुका आणि राज्य (ओडिशा) विधानसभा निवडणुका घेण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत, सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.”

निवडणूक आयोग लवकरच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. ओडिशामध्ये या वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे लोकसभा निवडणुकीसोबत ओडिशाच्या निवडणुकाही जाहीर केल्या जाऊ शकतात. या वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होऊ शकतात, असे मानले जात आहे. 17व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 रोजी संपणार आहे.

किती टप्प्यात मतदान होणार?
2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी 9 टप्प्यात मतदान झाले होते. 2024  च्या सार्वत्रिक निवडणुकीत 7 टप्प्यात मतदान झाले. आता 2024 च्या लोकसभा निवडणुका कोणत्या टप्प्यात होतील याची अधिकृत घोषणा निवडणूक आयोगाकडून केली जाईल.