लोभ नडला अन् युवक जुगारात फसला!

भास्त हा युवकांचा देश गजला जातो. पामुळे हे पुढचा काळ हा भारताचाच राहणार आहे. नव्हे, पाच बळावर भारत जागतिक पातळीवर आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येण्याचे संकेत सर्वांनीच दिले आहेत. या स्थितीत ग्रामीण भागातील विदारक वस्तुस्थितीला पाहजेही गरजेचे आहे. ग्रामीण भागातील युवक पूर्वी कष्टाळू होते. घाम गाळण्पावर त्यांचा विश्वास होता. आता मात्र ग्रामीण भागातील युवक भरकटले आहेत. ते देखील शहरातील मुलांप्रमाणे कष्ट न करता रातोरात श्रीमंत होण्याचे स्वप्न रंगवित आहेत. तो प्रकार भलेही ‘मुंगेरीलाल के हसीन सपनें प्रमाणे असला तरी त्याविषयी त्यांना कुठलेही शल्य नाही पण हा प्रकार असाच होत राहिला तर उद्या ग्रामीण भागाचे काय होईल?

ग्रामीण भागात असलेल्या शेतीचे वाटोळे होईल का? अर्थव्यवस्था खिळखिळी होईल का, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आले आहेत. अशाच सर्व प्रश्नांचा गांभीयनि अभ्यास केल्यानंतर एका पोलिस अधिकान्याने याविरोधात दंड धोपटले आणि सुरू केले धाडसत्र सहायक पोलिस अधीक्षक अनिल म्हस्के असे त्या धाडसी अधिकान्याचे नाव आहे. आपपीएस अधिकारी असलेले अनिल म्हस्के नागपुर ग्रामीण पोलिस दलात कार्यरत आहेत. त्यांनी पुढाकार घेत नागपूर जिल्ह्यातील सावनेर आणि कळमेश्वर तालुक्यातील सट्टापट्टी लिहिणाऱ्याऱ्यांची जन्मकुंडलीच समोर आणली. जन्मकुंडलीपेक्षा त्यांची ‘कर्मकुंडली’ फारच विचित्र आणि समाजाला भयावह संकटाच्या दरीत ढकलणारी असल्याचेही समोर आले. तालुका पातळीवर दोन-चार युवकांनी मिळून सट्टापट्टी लिहिण्याचे काम हाती घेतले. यात चंदा कमी होईल म्हणून त्यांनी गावागावांत आपले दलाल नेमले. आता गावात खूप काही गोष्टी फुकट मिळत असल्पाने युवकांना कष्ट करण्याची इच्छाच राहिलेली नाही. त्यांना फक्त स्वतःची व्यसने पूर्ण करायची असतात.

हेच ध्येप उराशी बाळगून मग ही युवा मंडळी पानटपरीवर बसून, पैसे असणान्यांना कसे फसवायचे, याचाब विचार करीत असतात. अशाच युवकांना हाताशी धरून दोन गुन्हेगारांनी सावनेर व कळमेश्वर तालुक्यात जाळे विगले. मग सुरू झाला गावागावांत सट्टापट्टी लिहिण्याचा गोरखधंदा यातील वैशिष्ट्य म्हणजे गावातील दलाल सक्रिय झाल्यानंतर ज्यांनी त्यांची नेमणूक केली होती, त्या गुन्हेगारांचा आठवड्याचा नफा १५ लाखांपर्यंत गेला. एवढा नष्ठा कुठल्याही व्यवसायात मिळत नाही. यामुळे ते अधिकच सक्रिय झाले. पण यामुळे शेकडो युवकांच्या मनात लोभ निर्माण झाला. तेही मग ‘बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपया’चा जप करू लागले. हा जय गावागावांत सुरू झाल्यानंतर लोभात अडकलेल्या युवकांना पाहून इतरही जुगाराच्या बक्रव्यूहात अडकले आहेत. हा जुगाराचा खेळ घराघरांत गेल्याने शेतात मजूर मिळणे कठीण झाले आहे.

ही सर्व स्थिती पाहता पोलिस अधिकाऱ्यांनी संपूर्ण योजना आखून वरळी-मटका चालविणाऱ्याऱ्यांची पाळेमुळे खोदून काढली. पातून जे काही बाहेर आले ते फारच भयावह आणि सामान्यांना चक्रावून सोडणारेच ठरले आहे. ‘शंभर रुपये लावा अन् हजार रुपये कमवा’ असा हा गोरखधंदा आहे. पण सट्टापट्टी लावणाऱ्या १००० लोकांपैकी एकालाच फायदा होतो. इतर ९९९ लोक स्वतःलाच फसवितात. म्हणूनच की काय कुवत नसतानाही गुन्हेगारांचा साप्ताहिक नफा १५ लाखांपर्यंत पोहोचला होता. हाच भयावह प्रकार समोर आल्यानंतर पुढे काय? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी कापदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या कृटीने केलेली कारवाई शंभर टक्के योग्यच आहे. पण समाजाचेही काही कर्तव्य आहे ना? त्याचाही विचार करून समाजातील होतकरूंनी युवकांना दिशा दाखविण्याचे कार्य करायला हवे.

युवकांनीही स्वतःच्या विवेकबुद्धीचा वापर करायला हवा. कुठलेही पश शॉर्टकट मार्गाने मिळत नाही, हेही समजून घ्यापला हवे. सट्टापट्टीतून कुठलाही माणूस आजपर्यंत कोट्यधीश झालेला नाही. ज्यांनी जुगारात पैसे लावले ते भिकारीच झाले आहेत, हे शाश्वत सत्य माहीत असतानाही युवकांची फौज सट्टापट्टी लावण्याच्या कामासाठी समोर येते. ही अधोगतीच म्हणावी लागेल. याच युवकांना शेतीच्या कामासाठी बोलावले तर ते चक्क नकार देतात. मग सट्टापट्टीचे काम काय स्टेटस् सिम्बॉल आहे का? तो तर समाजाला पोखरणारा देशद्रोहच आहे. यामुळे प्रशासनाने युवकांना दिशाहीन करणा-यांच्या विरोधात कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे. तशी तरतुद कायद्यात नसेल तर विधिमंडळाने तसे कायदे पारित करावेत. शेवटी ग्रामीण भागातील घाम गाळण्णची संस्कृती टिकवणे आपल्याच हाती आहे. अन्यथा घराघरात मटकाकिंग तार होतील.

९८८१७१७८५१