वंदे भारतबद्दल फेक नरेटीव्ह पसरवणाऱ्या साकेत गोखलेची रेल्वे मंत्रालयाकडून पोलखोल!

नवी दिल्ली : वंदे भारतबद्दल फेक नरेटीव्ह पसरवणाऱ्या साकेत गोखलेची रेल्वे मंत्रालयाने पोलखोल केली आहे. गरिबांना कोणताही फायदा नाही, असे वक्तव्य करत साकेत गोखलेंनी मोदी सरकावर टीका केली होती. मात्र आता रेल्वे मंत्रालयानेच साकेत गोखलेंनी केलेल्या वक्तव्याचे कान शेकले आहेत.

वंदे भारत रेल्वे उभारणीवेळी विरोधकांनी मोदी सरकारवर टीका केल्या होत्या. अनेक खोट्या बातम्या पसरवण्याचे काम विरोधकांकडून करण्यात आले होते. स्लीपर कोच पद्धतीचा प्रवास अनुभवण्यासाठी ५८,००० कोटींच्या करात बदल केला आणि या निर्णयामुळे एका रेल्वेची किंमत दुप्पट झाली आहे. मोदी सरकार ज्यांच्या फायद्यांसाठी हे सर्व करत आहेत. यावेळी या प्रकल्पाचा ठेकेदार कोण आहे असे त्या संबंधित मेसेजमध्ये नमूद करण्यात आला आहे.

संबंधित मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करण्यात आला असून खासदार साकेत गोखलेंनी ट्विट केले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ज्या ट्रेनची किंमत आधी २९० कोटी होती, आता त्याची किंमत ४३ कोटी असेल. ही एक एसी स्लीपर कोच रेल्वे आहे. याचा गरिबांना कोणताही फायदा नाही. त्यांनी पुढे सांगितले की, वंदे भारत करारातील ५० टक्के वाढीव खर्चाचा फायदा कोणाला आहे.

यावेळी सोशल मीडिया युझर अमीनने एक स्क्रीनशॉट शेअर करत ट्विट केले आणि लिहिले की, राफेल घोटाळ्यानंतर आताचा वंदे भारतचा घोटाळा समोर आला. यामध्ये १९४३० कोटींचा घोटाळा करण्यात आला असू शकतो.

याप्रकरणी व्हायरल करण्यात आलेल्या खोट्या मेसेजद्वारे अफवा पसरवण्यात आल्या. यामुळे आता रेल्वेमंत्रालय़ाने यासंबंधित दखल घेतली. साकेत गोखलेंनी केलेल्या ट्विटला उत्तर देत रेल्वे मंत्रालयाने फटकारले आहे. म्हणाले की, कृपया करून खोट्या बातम्या देणे टाळावे. प्रत्येकी कोचचा खर्च एकून डब्यांच्य़ा संख्येने गुणल्यास वंदे भारतच्या खर्चाशी बरोबर आहे.