वंशविच्छेदामुळे बांगलादेशात हिंदू लोकसंख्या ३० टक्क्यांवरून ८ टक्क्यांवर

नवी दिल्ली : बांगलादेशात शेख हसीना आणि त्यांच्या अवामी लीगविरोधात आंदोलन करून सत्तांतर घडविण्यात आले आहे. मात्र, या आंदोलनाच्या आड मुस्लिम कट्टरतावाद्यांनी तेथील हिंदू समाजाला लक्ष्य करून वंशविच्छेद करण्याचा जिहादी अजेंडा कायम ठेवला आहे.

भारताची फाळणी झाल्यानंतर १९४७ साली पूर्व बंगाल असताना आणि १९७१ नंतर बांगलादेशची निर्मिती झाल्यापासून धार्मिक अल्पसंख्याकांना, विशेषतः हिंदूंना पद्धतशीर दडपशाही आणि वंशविच्छेदाचा सामना करावा लागला आहे. बांगलादेशातील हिंदूंचा होणारा छळ ही काही नवी घटना नाही. त्यास खरे तर स्वातंत्र्यपूर्व काळातील बंगालच्या फाळणीचे संदर्भ आहेत. इस्लाम स्विकारा अथवा मृत्यू या तत्त्वज्ञानानुसार कट्टरतावादी मुस्लिम कार्यरत असतात. सध्या बांगलादेशात त्याचाच प्रत्यय येत आहे.

धार्मिक छळामुळे काही दशकांमध्ये हिंदू लोकसंख्येमध्ये लक्षणीय घट झाली आहे. या प्रदेशात १९४७ साली जवळपास ३० टक्के हिंदू लोकसंख्या होती. मात्र, आज हिंदूंची लोकसंख्या ८ टक्क्यांपेक्षाही कमी उरली आहे. लोकसंख्येची आकडेवारी बघितल्यास बांगलादेशातील हिंदू लोकसंख्येतील घट ही नैसर्गिक लोकसंख्याशास्त्रीय बदल नाही, तर दशकांच्या लक्ष्यित हिंसाचार, सक्तीचे धर्मांतर आणि राज्य-समर्थित भेदभाव यांचा परिणाम आहे. बांगलादेशमध्ये लोकशाही रुजू शकलेली नाही, राजकीय अस्थिरतेने बांगलादेशची पाठ सोडलेली नाही. मात्र, देशात राजकीय स्थैर्य असतानाही हिंदूंवर अत्याचार होतच आलेले आहेत.

हिंदूंच्या वंशविच्छेदाचे ‘चितगाव मॉडेल’
चितगाव हा बांगलादेशातील एक महत्त्वाचा प्रदेश. चितगावमधील डोंगराळ भाग एकेकाळी १०० टक्के हिंदू होता. मात्र, या भागाने सर्वाधिक अत्याचार सहन केले आहेत. बांगलादेशातील १९९७ सालच्या शांतता करारानुसार या भागात राहणाऱ्या स्वदेशी नागरिकांचे (त्यात बांगलादेशी हिंदूंही येतात) आणि त्यांच्या जमीनजुमल्यांचे संरक्षण करण्याची तरतूद करण्यात आली होती. मात्र, या भागात नियोजनबद्ध पद्धतीने मुस्लिम कट्टरतावादी गटांची घुसखोरी करविण्यात आली. त्यामुळे हिंदूंना विस्थापन, सक्तीचे धर्मांतर आणि प्राण गमवावे लागत आहे.