वक्फ बोर्डाला छत्रपती संभाजीनगरात दणका! कब्जा केलेल्या मैदानावर होणार फुटबॉल स्टेडियम!

छत्रपती संभाजीनगर : वक्फ बोर्ड राज्यातील आणि देशातील जमीनींवर तसेच वास्तुस्थळांवर दावा करत आहेत.याचपार्श्वभूमीवर नुकतेच मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने वक्फ बोर्डाला सुनावले होते. त्यानंतर आता राज्यातील छत्रपती संभाजीनगर येथील फुटबॉल खेळाच्या मैदानावर वक्फ बोर्डाने कब्जा केला आहे. याचपार्श्वभूमीवर ७ ऑगस्ट रोजी याबाबत अधिकृत माहिती प्रस्तुत करण्यात आली आहे. यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी वक्फ बोर्डाने कब्जा केलेल्या मैदानाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वक्फ बोर्डाने छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या आमखास मैदानावर कब्जा करून दावा केला होता. यानंतर राज्य सरकारने याबाबतीत राज्यातील नेत्यांची सभा घेतली होती. यावेळी शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी आमखास मैदानाबाबत सभा घेतली. यासभेसाठी राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडेही उपस्थित होते. यावेळी आमखास मैदान फुटबॉलसाठी वापरावे असे आदेश अब्दुल सत्तार यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सत्तार यांनी आदेश दिला. तसेच संजय बनसोडे यांनीही सत्तार यांच्या निर्णयाला हिरवा कंदिल दिला असून काम करण्यासाठी सांगितले.

आमखास मैदानाचा वापर केवळ सभांसाठी होत होता. अनेक मुस्लिम बांधव याठिकाणी मोठ्या संख्येने येत होते. तसेच याठिकाणी देशातून मौलवी आपली उपस्थिती दाखवत असायचे. यासभांचे आयोजन दावत-ए-इस्लामी संघटना करत होती. एमआयएम पार्टीचे नेते असुदुद्दिन ओवैसी यांनी याआधी अनेक सभा या मैदानावर घेतल्या होत्या. राज्यात तब्बल ३० जिल्ह्यात वक्फ बोर्ड आहे. वक्फ बोर्डाबद्दल केंद्र सरकार नवीन सुधारणा विधेयक लोकसभेत मांडले आहे. विरोधकांनी या विधेयकाला मोठा विरोध दर्शविला आहे. यासंदर्भातच विरोधी नेते मोर्चेबांधणी करत आहेत.