जळगाव : साकेगाव जवळील तापी नदीच्या काठावर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून दीडशे ते २०० एकरवर सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. मात्र येथे सातत्याने होत असलेल्या वृक्ष तोडीमुळे वृक्ष प्रेमींनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. हि वृक्ष तोड अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे होत असल्याचा आरोप वृक्ष प्रेमींनी कडून करण्यात आला आहे.
या बेसुमार कत्तलीमुळे या परिसरातील वनराई नष्ट होण्याचा धोका आहे. ही तोडलेली लाकडे ट्रॅक्टरच्या माध्यमातून अनेकांना विकली जातात . यातून त्यांना मोठी रक्कम मिळते. परंतु मोठ्या प्रमाणात होत असलेल्या या वृक्ष तोडीमुळे तेथील वन्य जीवांच्या अस्तित्वावर धोका निर्माण होण्याची वेळ आली आहे. या प्रकरणात लवकर कारवाई करा अशी मागणी वृक्ष प्रेमींकडून प्रशासनाला करण्यात आली आहे.