---Advertisement---

वरणगावातील माजी नगरसेवक नितीन माळी यांचा भाजपात प्रवेश

by team
---Advertisement---

भुसावळ : वरणगावातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व माजी नगरसेवक नितीन (बबलू) माळी यांनी नुकताच मुंबई भाजपा कार्यालयात कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आहे . भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाल्यानंतर माळी यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. माळी यांच्या प्रवेशानंतर आगामी काळात वरणगावातील निवडणुकांमध्ये समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, उद्योजक मनोज बियाणी, भाजपा शहराध्यक्ष युवराज लोणारी, अॅड. बोधराज चौधरी, महेंद्रसिंग ठाकूर, अजय नागराणी, निक्की बत्रा, देवा वाणी, प्रशांत पाटील, पुरुषोत्तम नारखेडे, अतुल झांबरे, विशाल शहा, आशिष पटेल, जितू माखीजा, प्रदीप वराडे (सर), ललित भंगाळे, निलेश कोळी, भूषण भंगाळे, नारायण तांबट, सुमित साळुंके, वृषभ धांडे, विपूल बहाटे, हर्षल वारके आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment