वसंत मोरे यांचा ‘वंचित’चा प्रयोग? पुणे लोकसभेत वाढणार चुरस

पुणे :  काहीच दिवसांपूर्वी मनसेला राम राम ठोकलेले वसंत मोरे अनेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहे. काहीही झालं तरी ‘मी लोकसभा निवडणूक लढणार आहे. असा पवित्र घेतलेले वसंत मोरे यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख्य नेत्यांची देखील भेट घेतली होती. शरद पवार, संजय राऊत यांची भेट घेतली आणि त्यानंतर थेट रवींद्र धंगेकरांचीदेखील भेट घेतली होती. वसंत मोरे यांनी आधी महाविकास आघाडीचे नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. मात्र महाविकास आघाडीमध्ये पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांना देण्यात आली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत वसंत मोरे उमेदवारी संदर्भात चर्चा करण्याची शक्यता आहे.

वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहे. ते राजगृहावर दाखल झाले आहेत. वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत आठ उमेदवार हे जाहीर केले आहेत. त्यांनी पुणे लोकसभेसाठी कोणताही उमेदवार घोषित करण्यात आला नाही आहे. त्यामुळे वसंत मोरे हे प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार आहेत.