वाघाच्या दातासंदर्भात प्रश्न विचारला, कौतुकाने दिले उत्तर, केलेले वक्तव्य आमदार गायकवाडांना भोवणार ?

बुलढाणा : अभिनेता हेमंत ढोमे हा विविध विषयांवरील त्याची मतं सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असतो. सोशल मीडियावरील हेमंतच्या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात. . शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या वाघाच्या शिकारीचं वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे.यावर हेमंत ढोमे यांनी केलेलं ट्विटहि चर्चेत आलं आहे.

“या शिकारी बाबूच्या गळ्यातला दात कायद्याने घशात घालण्यात यावा ही वन खात्याला नम्र विनंती आणि असे लोकप्रतिनीधी असतील तर कठीण आहे आपलं… तुम्हाला शौक करायला नाही तर आमची, महाराष्ट्राची, वन्य संपत्तीची, पर्यावरणाची सेवा करायला निवडून दिलंय! लक्ष द्या” या ट्वीटमध्ये हेमंतनं भूपेंद्र यादव आणि सुधीर मुनगंटीवार यांना टॅग देखील केलं आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण
आमदार गायकवाड यांनी बुलढाणा शहरात शिवजयंती कार्यक्रमला उपस्थिती लावली. शिवजंयतीच्या दिवशी संजय गायकवाड यांनी स्थानिक वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. त्या मुलाखातीत आपण १९८७ मध्ये वाघाची शिकार केली होती. त्याच्या दात गळ्यात बांधला आहे. बिबट्या वगैरे तर आपण असेच पळवतो, असे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे. संजय गायकवाड यांची ही मुलाखत व्हायरल झाली.

आमदार संजय गायकवाड यांची ही मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यांनी केलेल्या शिकारीची जोरदार चर्चा झाली. मग वनविभागाचे अधिकारी जागे झाले. त्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ कायद्या नुसार आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला. तसेच गळ्यातील तो दात जप्त करुन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर आमदार गायकवाड यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.