वाढत्या आत्महत्यांमुळे देशाच्या तिजोरीवर तब्ब्ल इतक्या लाख कोटींचा भार ?

मुंबई : देशात आत्महत्यांमुळे अर्थव्यवस्थेवर १.४० लाख कोटी रुपयांचा भार पडत असल्याचे एका अभ्यासांती नुकतेच समोर आले आहे. यामध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक असल्याचे या अभ्यासात म्हटले आहे. तसेच, सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यामध्ये कर्नाटक अग्रस्थानी आहे.

देशातील आत्महत्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयावर आर्थिक भार टाकत असून, हा भार तब्बल १.४० लाख कोटी रुपयांचा असल्याचे डॉक्टरांनी केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. याबाबतचा अहवाल वैद्यकीय विषयावर आदर्श मानलेल्या एका नियतकालिकात नुकताच प्रसिद्ध झाला. यामध्ये सर्व राज्यांतील आत्महत्या आणि त्यामुळे प्रत्येक राज्याच्या केंद्र सरकारवर पडणारा भार, याची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे.

यामध्ये कर्नाटकमुळे येणारा भार सर्वाधिक असून, तो २३ हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यानंतर तामिळनाडू २१ हजार कोटी आणि महाराष्ट्र १८ हजार कोटी रुपयांच्या भारासह अनुक्रमे दुसर्‍या-तिसर्‍या स्थानी आहेत. पहिल्या तीन राज्यांचा वाटा केंद्र सरकारवर एकूण भाराच्या ४८ टक्के आहे. या आत्महत्या कमी करण्यासाठी आत्महत्या प्रतिबंधक उपाययोजना धोरणाची निर्मिती करण्यात आली असून, २०३० पर्यंत आत्महत्येचे प्रमाण दहा टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य निर्धारित केले असल्याचेदेखील या अभ्यासात म्हटले आहे.

अहवालातील ठळक बाबी
आत्महत्या करणार्‍यांमध्ये सर्वाधिक संख्या युवकांची
२०-३४ वयोगटातील युवकांच्या सर्वाधिक आत्महत्या
केंद्रावर पडणार्‍या भाराचा ५३ टक्के भाग हा युवक आत्महत्येचा
दर एक लाख मृत्यूमागे १४ मृत्यू हे आत्महत्येमुळे