---Advertisement---

वादळाने स्मारकावर पडल्या फांद्या, मनपाने नाही उचलल्या, शामाप्रसाद मुखर्जी उद्यानातील चित्र

by team

---Advertisement---

---Advertisement---

जळगाव : तीन ते चार दिवसांपुर्वी जोरदार वाऱ्यासह अवकाळी आलेल्या पावसामुळे शहरातील शामाप्रसाद मुखर्जी उद्यानातील अनेक झाड्यांच्या फांद्या तुटून पडल्यात. या सर्व फांद्या उद्यानात असलेल्या दुसऱ्या महायुध्दातील शहीदांच्या स्मारकाच्या सभोवती टाकण्यात आल्या आहेत. याबाबत उद्यानात येणाऱ्यांनी मनपाच्या भोंगळ कारभाराबात तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामुळे शहरातील विविध रस्त्यांवरील झाडे मुळासकट उन्मळून पडली तर काहींच्या फांद्या तुटून पडल्यात. महापालिकेने मुख्य रस्त्यावरील उन्मळून पडलेली झाडे उचलून रस्ते मोकळे केले. मात्र उद्यानातील तुटलेल्या झाडांच्या फांद्या उचललेल्या नाहीत.

शहीदांच्या स्मारकासभोवती फांद्याजिल्हा परिषदेजसमोर असलेल्या शामाप्रसाद मुखर्जी उद्यानातही अनेक झाडांच्या फांद्या तुटून पडल्या होत्या. उद्यानात असलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या सर्व तुटलेल्या फांद्या जमा करून कोपऱ्यात असलेल्या दुसऱ्या महायुध्दातील शहीद स्मारकासभोवती टाकून दिल्या आहेत.स्मारकाचा घुमूटही तुटलाजोरदार वारा व तुटलेल्या फांद्यामुळे या शहीद स्मारकावरील गोल घुमूटही तुटून खाली पडला आहे.पाला वाळला फांद्या तशाचशहीद स्मारकासभोवती टाकलेल्या फाद्यांचा पाला वाळून खाली पडून कचरा तयार झालेला आहे. तर फांद्या तशाच पडलेल्या आहेत.बांधकाम विभागाच्याअभियंत्यांचेही दुर्लक्ष्ाउद्यानात बांधकाम विभागाचे कार्यालय असले तरी अभियंत्यांसह कर्मचाऱ्यांनी या फांद्या बाजूला करून स्मारकाची स्वच्छता करण्याकडे दुर्लक्ष्ा केले आहे

उद्याने की अनारोग्याचे ठिकाणमहापालिका शहरात सर्वत्र स्वच्छ शहर अभियान राबवित असले तरी मनपाच्या मालकीच्या शामा प्रसाद मुखर्जी उद्यानाच्या देखभालीकडे दुर्लक्ष्ा केले आहे. उद्यानात सर्व घाणीचे साम्राज्य पसरले असून जागोजागी चिखल झालेला आहे. उद्यानात असलेल्या पाण्याच्या टाकीच्या जलवाहीन्यांना गळती लागलेली असून हे सर्व पाणी उद्यानात साचून तळे तयार झालेले आहे. यात विविध प्रकारच्या डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होत आहे. या डासांच्या त्रासामुळे, दुर्गंधीमुळे उद्यानात नागरिक येत नाहीत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---