रावेर : बोदवड तालुक्यात २६ रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे केळी पिकांसह महावितरण साहित्य पोल, तार व रोहीत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खासदार रक्षा खडसे यांनी ३१ रोजी प्रत्यक्ष भेट देत नुकसानाची पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संबंधितांकडून तत्काळ पंचनामे करून घेण्याच्या सूचना केल्या.
रावेर व बोदवड तालुक्यात २६ रोजी अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने जोरदार हजेरी लावली. यामुळे केळी पिकांसह महावितरण साहित्य पोल, तार व रोहीत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. खासदार रक्षा खडसे यांनी ३० रोजी या भागात प्रत्यक्ष भेट देत नुकसानाची पाहणी केली.
यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संबंधितांकडून तत्काळ पंचनामे करून घेण्याच्या सूचना केल्या. पोल, तार व रोहीत्राच्या उभारणीसाठी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे.