नवी दिल्ली: भारतीय वायुदलाने आपले नावबदलण्याची तयारी पूर्ण केली आहे. भविष्यात वायुदलाला ‘इंडियन एअर ॲण्ड स्पेस फोर्स’ अर्थात2 भारतीय वायू आणि अंतरिक्ष दल म्हटले जाऊशकते. लवकरच या नावाला अंतिम मंजुरी मिळू शकते. जगभरात आपली ओळख केवळ शक्तिशाली वायुदल नव्हे, तर एक विश्वसनीय एअरोस्पेस पॉवर म्हणून व्हावी, अशी वायुदलाची इच्छा आहे. यासाठी वायुदलाने एक तत्त्व प्रणाली तयार केली आहे. ‘स्पेस व्हिजन-2047′ असे या तत्त्व प्रणालीला नावदिले आहे. यानुसार वायुदल इस्रो, डीआरडीओ, इन-स्पेस आणि इतरखाजगी कंपन्यांसोबत एक करार करेल. अंतराळ तंत्रज्ञानात पुढे जाण्यासाठी एक वातावरण या माध्यमातून तयार केले जाईल.
सध्या वायुदलाकडे संपूर्णपणे ऑटोमोटेड एड डिफेन्स नेटवर्क आहे. या इंडिग्रेटेड एअर कमांड ॲण्डकंटोल सिस्टिम म्हटले जाते. याला इंटिग्रेटेड एअर स्पेस कमांड ॲण्डकंटोल सिस्टिममध्ये बदलण्याची योजना आहे. वायुदलाने अधिकारी आणि एअरमॅन यांना अंतराळ संबंधीचे प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. मार्च 2019 मध्ये डीआरडीओने मिशन शक्तीच्या माध्यमातून अंतराळातील आपलाजुना उपग्रहाचा वेध घेतला होता. यासाठी ॲन्टी-सॅटेलाईट इंटरसेप्टरमिसाईलचा वापर करण्यात आला होता. या क्षेपणास्त्राने 740 किलोवजनाच्या मायक्रोसॅट-आर उपग्रहाचा238 किमी उंचीवर वेध घेतला होता.स्पेस कमांड उभारण्याची तयारीकेंद्र सरकार लवकरच ही मागणीपूर्ण करेल, अशी वायुदलाला अपेक्षा आहे. पूर्ण क्षमता आणि स्वतंत्रपणे निर्णय घेणारे स्पेस कमांड उभारण्याची तयारीही वायुदल करीत आहे. याअंतर्गत वायुदलाकडे स्वत…चे 100 उपग्रह अंतराळात तैनात असतील आणि या माध्यमातून शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जाईल. चीन-अमेरिकेकडेही ‘स्पेस फोर्स’चीन या दिशेने अत्यंत वेगानेकाम करीत आहे. कायनेटिक ए-सॅटशस्त्र स्थापित केले जात आहेत. म्हणजे या माध्यमातून अंतराळात क्षेपणास्त्रे किंवा उच्च शक्तीचे लेझरबिम सोडले जातील किंवा जामर्सअथवा सायबर वेपनचा वापर केला जाणल. चीनने या दलाला पीपल्स लिबरेशन आर्मी स्टॅटेजिक सपोर्टफोर्स नाव दिले आहे. युनायटेड स्टेटस स्पेस फोर्स, असे अमेरिकेच्या दलाचे नाव आहे.