भारत डायनेमिक्स लिमिटेडने भारतीय वायुदलाला अस्त्र क्षेपणास्त्रांची पहिली खेप सोपवली आहे. नजरेच्या पलीकडे असलेल्या लक्ष्याचा अचूक वेध करणारे हे हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. अलिकडेच तेजस लढाऊ विमानातूनही याची चाचणी घेण्यात आली होती. तेजस विमानाने २० हजार फूट उंचीवरून डागले ल्या अस्त्र क्षेपणास्त्राने अचूक लक्ष्यवेध केला होता.
क्षेपणास्त्राची तेजस एमके-२ विमानातून चाचणी घेतली जात आहे. अस्त्र लांब पल्ल्याचा मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. सध्या याचा वापर तेजस-एमके १ वर केला जाणार आहे. वायुदल याच्या कामगिरीवर समाधानी आहे. वायुदलाला २०० क्षेपणास्त्रे मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘या’ विमानांवर वापर अस्त्र क्षेपणास्त्र लक्ष्याच्या दिशेने डागल्यानंतर हवेतच दिशा बदलण्याची क्षमता यात आहे.
क्षेपणास्त्र फायबर ऑप्टिक गायरो बेस्ट इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टिमवर आधारित आहे. या क्षेपणास्त्राच्या सुरुवातीच्या व्हिरिएंटचा मिग-२९ यूपीजी, मिग-२९ के, सुखोई-३० एमकेआय आणि तेजस एमके १/१ एवर वापर केला जात आहे. लक्ष्यावर नजर ठेवून असते. लक्ष्य डावीकडे किंवा उजवीकडे सरकले तरीही अस्त्र त्याचा अचूक वेध घेते. व याचे वजन १५४ किलो आहे. लांबी १२.६ फूट, तर व्यास सात इंचाचा आहे. क्षेपणास्त्रात ऑप्टिकल प्रॉक्सिमिटी फ्यूज लावण्यात आला आहे. याच्या मदतीने क्षेपणास्त्र
वेगामुळे ठरते घातक
या क्षेपणास्त्राचा वेग शत्रूसाठी अतिशय घातक ठरतो. हे क्षेपणास्त्र कमाल ६६ हजार फूट उंचीवरून ५,५५६ किमी प्रती तास या वेगाने झेपावते. क्षेपणास्त्रात हाय एक्सप्लोसिव्ह किंवा प्री-फ्रेगमेंटेड शस्त्र लावले जाऊ शकते. हे १५ किलो स्फोटके वाहण्यास सक्षम आहे