वाराणसीचे क्रिकेट स्टेडियम होणार ‘शिवमय’

वाराणसी :  मध्ये  त्रिशूल, डमरूच्या आकाराचे क्रिकेट स्टेडियम  बांधण्यात येणार आहे.  स्टेडियम शिवमय असून, 30 एकरांवर अंदाजे 450 कोटी रुपये खर्चून विकसित केले जाणार आहे. या स्टेडियमध्ये बसण्याची क्षमता  30,000 असेल, ज्यात देवता ‘भगवान शिव’ द्वारे प्रेरित थीमॅटिक आर्किटेक्चर असेल. यासोबतच राज्यभरात उभारल्या जाणार्‍या 16 निवासी शाळा अंदाजे 1,115 कोटी रुपये खर्चून बांधल्या जातील. विशेषत: कामगार, बांधकाम कामगार आणि कोविड-19 महामारीमुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी असणार आहे. ज्याचा उद्देश दर्जेदार शिक्षण देणे आणि मुलांच्या सर्वांगीण विकासास मदत करणे हा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 सप्टेंबर रोजी त्यांच्या वाराणसी दौऱ्यात संपूर्ण उत्तर प्रदेशातील 16 ‘अटल आवासीय विद्यालया’चे  उद्घाटन करतील आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी करतील. पंतप्रधान कार्यालयाकडून निवेदनात म्हटले आहे की, दुपारी 1:30 वाजता पंतप्रधान मोदी  वाराणसीतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी करतील. दुपारी 3:15 च्या सुमारास, पंतप्रधान रुद्राक्ष आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि अधिवेशन केंद्रात पोहोचतील आणि काशी संसद सांस्कृतिक महोत्सव 2023 च्या समारोप समारंभात सहभागी होतील. या कार्यक्रमादरम्यान, ते संपूर्ण उत्तर प्रदेशात बांधलेल्या 16 अटल निवासी शाळांचे उद्घाटनही करतील.