महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा विदर्भातून सुरु होत आहे. अश्यातच निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेला एकामागे एक धक्के बसत आहेत. आता विदर्भातील उमरेड मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना आपल्या आमदारकी आणि पक्षसदस्यत्वाचा राजीनामा देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार कृपाल तुमाने आणि आशिष जैस्वाल यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. राजू पारवे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असून ते धनुष्यबाण चिन्हांवर रामटेकमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची चर्चा आता रंगली आहे. महायुतीतमध्ये रामटेक मतदारसंघ शिवसेनेला मिळणार आहे, त्यामुळे उमेदवारीसाठी राजू पारवेंनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.