पुणे : शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक आणि राज्याला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. अभिनेते रमेश परदेसी यांनी पुण्यातील तरुणाई नशेत टुल्ल असल्याचं व्हिडीओ समोर आणल्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यामुळे राज्यात नव्हे तर देशभरात जात ड्रग्सची कारवाई करणाऱ्या पुणे पोलिसांच्या मशाली खालीच अंधार असल्याची चर्चा आता सगळीकडे होऊ लागली आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आयुक्तपदाचा चार्ज घेतल्यानंतर देशातला सगळ्यात मोठा ड्रग्स साठा उध्वस्त केला आहे. याबाबत काल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ लाखांचा धनादेश देऊन पुणे पोलिसांचा सत्कारही केला. परंतु इतकी मोठी कारवाई करूनही पुण्यात ड्रग्स सेवन करणाऱ्यांना ड्रग्स सहजपणे उपलब्ध होत असल्याचं चित्र आज या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलं आहे.
काय आहे संपूर्ण प्रकार
पुण्यातील कोथरूड परिसरातील प्रसिद्ध वेताळ टेकडीवर दोन मुली दारू आणि ड्रग्सच्या नशेत धुंद असलेल्या अवस्थेत असल्याचा प्रकार रमेश परदेशी यांनी केलेल्या व्हिडिओत दाखवला आहे. या व्हिडिओत दिसणाऱ्या मुलीमध्ये एक झोपलेल्या अवस्थेत आहे. तर दुसऱ्या मुलगी शुद्ध हरपल्याच्या अवस्थेत दिसून येत या परिस्थितीत रमेश परदेशी यांनी टेकडीवर आलेल्या नागरिक आणि तरुणांच्या मदतीने मुलींच्या चेहऱ्यावर पाणी मारलं आणि जाग करण्याचा प्रयत्नही केला. यानंतर या मुलींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ते पुढे म्हणाले की, वेताळ टेकडीवर यापूर्वीदेखील हे प्रकार अनेकदा दिसले. अनेक कॉलेज तरुण-तरुणी सनसेट पाहण्यासाठी टेकडीवर कोल्ड्रिंग्स वगरे घेऊन जातात. त्यामुळे या सर्वाची कल्पना यापूर्वी आली नाही. अनेक मुलं नियंत्रित असल्यामुळे हा प्रकार कादचित लक्षात आला नाही. मात्र यापूर्वी अनेकदा असे प्रकार दिसले त्यांना आम्ही थांबवण्याचाही प्रयत्न अनेकदा केले आहेत. त्यांना टेकडीवरुन जाण्यासदेखील सांगितलं आहे.