मुंबई : महाराष्ट्र राज्यतील सरकारी शाळातील विध्यार्थ्यांना दिल्या दिल्या जाणार्या माध्यान्ह भोजनात खिचडीशिवाय अंडी किंवा केळी देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना तांदूळ व मसूरपासून तयार केलेल्या खिचडीशिवाय आठवड्यातून एकदा उकडलेले अंडे किंवा अंडी पुलाव किंवा अंड्याची बिर्याणीसुद्धा दिली जाणार आहे. शाकाहारी विद्यार्थ्यांना त्या दिवशी केळी किंवा इतर कोणतेही फळ दिले जाईल, असा सरकारी निर्णय मंगळवारी जारी करण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी चालू शैक्षणिक वर्षात केली जाईल, असे त्यात म्हटले आहे.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेत अंड्यांचा समावेश केला जाईल. नियमित पोषणाव्यतिरिक्त अंडी आठवड्यातून एकदा दिली जातील. ग्रामीण भागांत शाळा व्यवस्थापन समिती आणि शहरी भागात केंद्रीय स्वयंपाकघर पुरवणार्या एजन्सीद्वारे ही तरतूद केली जाईल, असे अध्यादेशात म्हटले आहे. ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापन समिती अंडी खरेदी करेल आणि दर बुधवारी किंवा शुक‘वारी उकडलेले अंडी, अंडी पुलाव किंवा अंडी बिर्याणी देईल. जे विद्यार्थी शाकाहारी आहेत, त्यांना केळी किंवा कोणतेही फळ दिले जाईल.माध्यान्ह भोजन योजना इयत्ता 1 ते 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येते.