विधानसभा अध्यक्ष नार्वेकर ‘या’ आमदारांना नोटीस बजावणार

मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षांत सर्वोच्च न्यायालयाने त्या १६ आमदारांचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यासंदर्भात आजपासून प्रत्यक्ष कार्यवाही करण्याचा निर्णय केला आहे.

विधानसभा अध्यक्ष सत्ता संघर्षांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि शिंदे गटातील ५४ आमदारांना नोटीस बजावणार आहेत. या सर्व ५४ आमदारांना सात दिवसांच्या आत आपली बाजू मांडण्यास सांगण्यात येईल. यामुळे अध्यक्ष नार्वेकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

यात विधानसभा अध्यक्ष आज दोन्ही गटाकडून राजकीय पक्षाची घटना मागवतील. राजकीय पक्ष कोण ? हे तपासण्यासाठी पक्षाच्या घटनेचा अभ्यास करण्यात येईल. त्याच प्रमाणे ठाकरे आणि शिंदे गटातील ५४ आमदारांना आजच नोटिसा बजावण्यात येणार आहेत. पुढील सात दिवसात भूमिका मांडण्यासाठी आमदारांना वेळ देण्यात येणार आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.