नवी दिल्ली: भारतीय कुस्ती महासंघाच्या नवीन कार्यकारिणीला निलंबित केल्यानंतरही कुस्तीपटू विनेश फोगटने ब्रिजभूषण शरण सिंह यांचे विश्वासू संजय सिंह यांच्या डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष म्हणून निषेध करण्यासाठी आपला प्रतिष्ठेचा खेलरत्न व अर्जुन पुरस्कार केंद्र सरकारला परत करण्याचा निर्णय घेतला आहे.मी माझा मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुना पुरस्कार परत करत आहे, असे विनेशने आपल्या पोस्ट केलेल्या पत्राद्वारे जाहीर केले.
ऑलिम्पिक पदकविजेते बजरंग पुनिया व डेफ्लिम्पिक विजेता विरेंद्रसिंग यादव यांनी पद्मश्री पुरस्कार परत केल्याच्या काही दिवसानंतर विनेशने हा निर्णय घेतला.तथापि, क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाच्या घटनेच्या तरतुदींचे पालन न केल्याबद्दल भारतीय कुस्ती महासंघावर नव्याने निवडून आलेल्या कार्यकारिणीला निलंबित केले व भारतीय ऑलिम्पिक संघटनेला (आयओए) कुस्ती महासंघाचे कामकाज व्यवस्थापित करण्यासाठी अस्थायी समिती स्थापन करण्यास सांगितले.डब्ल्यूएफआय प्रशासनात ब्रिज भूषणच्या जवळच्या सहकाऱ्यांना स्थान देऊ नये, असा कुस्तीपटूंनी आग्रह धरला होता. निवडणूक निकालानंतर रिओ ऑलिम्पिकचे कांस्यपदक विजेती साक्षी मलिकने कुस्तीला रामराम ठोकल्याचे जाहीर केले.