विमानाने प्रवास करू इच्छिणार्‍यांसाठी आनंदाची बातमी ; तिकीट दराबाबत IndiGoने घेतला ‘हा’ निर्णय

नवी दिल्ली । विमानाने प्रवास करणार्‍या आणि करू इच्छिणार्‍यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नुकतेच एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) किमतीत मोठी झाल्यामुळे इंडिगो खासगी विमान कंपनीने त्यांच्या तिकीट दर कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

इंडिगो एअरलाइन्सने स्वस्त तिकिटांबाबत मोठी घोषणा केली आहे. विमान कंपन्यांच्या म्हणण्यानुसार आता विमान भाडे 300 ते 1000 रुपयांनी कमी करावे लागणार आहे. विशेष बाब म्हणजे विमान कंपन्यांनी स्वस्त भाडे आज 4 जानेवारी 2024 पासून लागू केले आहे. इंडिगो एअरलाइन्सने तिकीट दर कमी करण्यामागे इंधन अधिभार हटवण्याचे कारण दिले आहे. एव्हिएशन फ्युएल किंवा एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एएफटी) च्या किमती कमी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे एअरलाइन्सने म्हटले आहे.

खरं तर, गेल्या वर्षी 2023 मध्ये, AFT ने किमतींमध्ये लक्षणीय वाढ केली होती. यामागे इंधन अधिभारात वाढ झाल्याचेही सांगण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे ही वाढ करण्यात आली आहे. जेट इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी कंपनीने त्यावेळी हा निर्णय घेतला होता.

एकूणच, आता इंडिगो एअरलाइन्सने प्रवास करणे सोपे आणि स्वस्त होणार आहे. लोकांना कमी दरातच तिकिटे मिळतील. मात्र, इंडिगोचा विचार करता इतर विमान कंपन्याही त्यांच्या तिकीट दरात कपात करतील, अशी अपेक्षा आहे.