विराट आणि अनुष्काच्या मुलाला मिळणार ब्रिटिश नागरिकत्त्व ? सोशल मीडियावर रंगली जोरदार चर्चा

भारतीय क्रिकेटर विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा पुन्हा एकदा आई-वडील झाले आहेत. अनुष्का शर्माने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती की तिचा मुलगा अकाय कोहलीचा जन्म झाला आहे. वामिकाचा धाकटा भाऊ जगात आला आहे. यासोबतच या जोडप्याने मीडियाला त्यांच्या गोपनीयतेचे आवाहनही केले होते. अनुष्का शर्माने १५ फेब्रुवारीला एका मुलाला जन्म दिला असून त्याचे नाव अकाय ठेवण्यात आले आहे. परंतु अनुष्का शर्माने लंडनमध्ये अकायला जन्म दिला असून यासोबतच अकायला ब्रिटिश नागरिकत्व मिळणार असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

मात्र प्रश्न असा आहे की, अकाय कोहलीला नागरिकत्व कुठून मिळणार? लंडनमध्ये त्यांचा जन्म झाल्यामुळे अटकळ निर्माण झाली होती. अनुष्का-विराटने ‘अकाय’ च्या जन्माची बातमी सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. त्याचवेळी लोकांमध्ये चर्चा सुरू झाली की, अकायचा जन्म लंडनमध्ये झाला असल्याने त्याला नक्कीच तिथले नागरिकत्व मिळेल. अकाय कोहलीला भारतीय नागरिकत्व मिळणार की ब्रिटीश नागरिकत्व, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे, अकायचा जन्म लंडनमध्ये नक्कीच झाला होता पण त्याला तिथले नागरिकत्व मिळालेले नाही.

ब्रिटिश नागरिकत्वासाठी काय नियम आहेत?
ब्रिटीश सरकारच्या नियमांनुसार तेथील नागरिक होण्यासाठी पालक किमान ब्रिटिश नागरिक असले पाहिजेत किंवा त्यांनी तेथे बराच काळ वास्तव्य केले असावे. यामुळे ब्रिटनच्या बाहेर राहणाऱ्या ब्रिटिश नागरिकांच्या मुलांना आपोआप तिथले नागरिकत्व मिळते.