क्रिकेट विश्व: टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दोन सामने झाले असून तीन सामने शिल्लक आहेत. टीम इंडियाचा दिग्गज विराट कोहलीनं वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. अशातच विराट कोहलीबाबत एका दिग्गज खेळाडूनं केलेल्या वक्तव्यामुळे सध्या क्रिकेट विश्वात खळबळ माजली आहे.
विराट कोहलीवर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधारानं केलेल्या आरोपानं क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डीन एल्गरनं विराट कोहलीवर अत्यंत घृणास्पद आरोप केला आहे. “एका सामन्यात विराट कोहली माझ्यावर थुंकला होता.”, असा आरोप डीन एल्गरनं केला आहे. डीन एल्गरनं 2015 मधला एक किस्सा सांगताना कोहलीवर गंभीर आरोप केला आहे.तो म्हणाला कि, जेव्हा मी बॅटिंगसाठी मैदानात आलो आणि खेळताना मी, अश्विन आणि जाडेजासमोर स्वतःचा बचाव करत होतो, तेवढ्यात विराट कोहली आला आणि माझ्यावर थुंकला.
दरम्यान, एल्गरनं आणखी एका गोष्टीचाही खुलासा केला की, हा वाद झाल्यानंतर विराट कोहलीनं त्याची माफीही मागितली होती. जेव्हा 2017-2018 मध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता, त्यावेळी विराट कोहलीनं एल्गरची माफी मागितली होती.