विराट कोहली दुसऱ्यांदा पिता होणार

विराट कोहली पुन्हा एकदा पिता होणार आहे. कोहलीचा खास मित्र आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डीव्हिलियर्सने ही माहिती दिली आहे. ३९ वर्षीय माजी फलंदाज डीव्हिलियर्सने भारत-इंग्लंड कसोटीच्या दुसऱ्या दिवसानंतर यू- ट्यूब वाहिनीवर मुलाखतीत सांगितले.मी कोहलीला फोन करून त्याच्या प्रकृतीची चौकशी केली.यावर विराटने मला सांगितले की, तो आपल्या कुटुंबासोबत आहे. पुढे बोलताना डीव्हिलियर्स म्हणाला की विराटचे दुसरे अपत्य येणार आहे. या कारणास्तव तो कुटुंबासोबत आहे, असे डीव्हिलियर्स म्हणाला.

याआधी, विराट कोहली ११ जानेवारी २०२१ रोजी पहिल्यांदा पिता झाला आणि ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून भारतात आला. कोहलीने आपल्या मुलीचे नाव ‘वामिका’ ठेवले आहे. कोहली इंग्लंडविरुद्ध पहिले दोन कसोटी सामने खेळत नाही. २५ जानेवारीपासून सुरू असलेल्या भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये विराट कोहली भारतीय संघाचा भाग नाही.

वैयक्तिक कारणामुळे त्याने पहिल्या दोन सामन्यासाठी संघातून माघार घेतली आहे. यावर बीसीसीआयने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की कोहलीने कर्णधार रोहित शर्मा, निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनाशी संवाद साधला व कौटुंबिक कारणांमुळे सुट्टी घेतली आहे. त्यांच्या निर्णयाचा आदर करण्याचे आवाहनही मंडळाने केले आहे.