विश्वमांगल्य सभेच्या मातृ संमेलनात जळगाव जिल्हा कार्यकारिणी ची घोषणा

जळगाव : भारत विश्वगुरू होण्याकरिता देशातील प्रत्येक स्त्रीचा सहभाग हा महत्वाचा आहे आणि त्याकरिता प्रत्येक घरातील आई ही वैचारिक रित्या सक्षम होणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून भारतीय संस्कृतीची जपणूक करण्यात पुढील पिढी समर्थ होईल, असे प्रतिपादन विश्व मांगल्य सभेच्या राष्ट्रीय महासचिव सोनिया तराळकर यांनी १४ तारखेला झालेल्या मातृ संमेलनात केले.

कार्यक्रमाची सुरुवात सोनिया रडे यांनी सादर केलेल्या गणेश वंदनेने झाली. त्यानंतर विश्व मांगल्य सभेच्या राष्ट्रीय अध्यक्ष रेखा ताई खंडेलवाल यांनी जळगाव येथील कार्यकारिणीची घोषणा करून पुढील कार्याकरिता शुभेच्छा दिल्या.तसेच उमंग सृष्टी फाउंडेशन संस्थे च्या अध्यक्ष संपदा पाटील यांनीही कार्याकरिता शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले. व अनुभूती शाळेच्या संस्थापिका निशा जैन यांनीही आजच्या महिलेने स्वतः मध्ये असलेल्या शक्तीला ओळखून त्याचे चिंतन करावे असे सांगितले.

व्यासीठावर नवनिर्वाचित अध्यक्ष वंदना गर्गे व  सीमा भोळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन  मोहीनी भांडारे यांनी केले , शक्तिगांन मेघा साखरे यांनी व पंचाक्षर स्तोत्र शिल्पा सफळे यांनी सादर केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक वंदना ताई गर्गे यांनी सादर केले. श्री शिव महिम्न स्तोत्राचे पठण व ध्वज प्रार्थना राधा अपराजित आणि शीतल शिंदे नी केले. कार्यक्रमाची सांगता स्नेहा कोष्टी यांच्या आभार प्रदर्शनाने झाली व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण कार्यकारिणीने परिश्रम घेतले.