विसरवाडीनजीक ट्रक-मोटारसायकलचा भीषण अपघात

नवापूर :  तालुक्यातील विसरवाडी गावानजीक 16 रोजी सरपणी नदीच्या पुलाजवळ ट्रक व मोटारसायकलीचा भीषण अपघात होवून दोघांचा मृत्यू झाला असून तिसरा गंभीर जखमी झाला आहे. विसरवाडी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर ट्रक व मोटारसायकलीची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. यात एक युवकाचा ट्रकचा मागच्या चाकात अडकल्याने  जागीच मृत्यू झाला तर दुसरा त्याचा सहकारी ट्रकच्या पुढील चाकात आल्याने गंभीर जखमी झाला. तिसरा सहकारी देखील अपघातात मयत झाला आहे.अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेण्यासाठी 108 ॲम्बुलन्स नसल्याने खाजगी वाहनांने रुग्णालयात दाखल केले. अपघात होताच घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळतात तात्काळ विसरवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. अपघातग्रस्त युवकांना स्थानिकाच्या मदतीने खाजगी वाहनाने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या अपघातात नवापूर तालुक्यातील दापूर उची मौली येथील   सुनील वसंत गावित या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे  दुसरा युवकाचा विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मयत झाला.  त्याची ओळख पटली नसून तिसरा युवकदेखील गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.