शिंदखेडा: मुलगा नाही म्हणून काय झाले मुलगीच त्यांचा मुलगा बनली…आयुष्यातील अखेरच्या काळात तिनेच त्यांचा सांभाळ केला …आणि…तिनेच त्यांच्यावर अग्निसंस्कार केले. यात तिच्या पतीसह सासूने ही तेवढीच तिला साथ दिली. एक नवा आदर्श या कुंटूंबाने मुलगा नसलेल्या दाम्पत्याच्या मुलींसमोर निर्माण केला.त्यांचे शहरात कौतूक होत आहे.शिंदखेडा शहरातील नेहा परेश शाह असे या मूलीचे नाव आहे. चोपडा येथील दिपक रतीलाल गूजराथी यांना मुलगा नाही. एकच मूलगी ती नेहा. गुजराथी हे एका शाळेत प्रयोग शाळा सहाय्यक म्हणून सेवेत होते. पत्नीच्या अकाली निधनानंतर ते एकटेच रहायचे.
सेवा निवृत्तीनंतरही त्यांनी आपल्या घरी एकटेच राहणे पसंत केले. मात्र वय वाढत गेले. वयाने पंचात्तरी गाठली.हात पाय काहीही काम करु देत नव्हते. शरीर थकले होते, अशा वेळी माझे पूढे काय होईल या चिंतेने ते ग्रासले होते. मात्र त्यांची मुलगी नेहा, तिचे पती परेश शाह आणि आई समान असलेली सासू मालतीबाई शहा त्यांच्यासाठी धावून आली. त्यांनी सहा महिन्यांपूर्वी त्यांना शिंदखेडा येथे आपल्या घरी घेवून आले. त्यांची सेवा करू लागले. वेळच्या वेळी जेवण, डॉक्टर, औषधं.. त्यांच्याशी गप्पा हे नियमितपणे होऊ लागल्या. त्यांना कधीही मुलगा नसल्याची खंत जाणवू दिली नाही.दोन दिवसांपूर्वी त्यांची तब्येत बिघडली डॉक्टर ईलाज झाले .मात्र उपयोग झाला नाही.त्यांचे निधन झाले.निधनानंतर त्यांना अग्निडाग कुणी द्यायचा यावर अनेकांनी धर्म परंपरेनूसार विविध मार्ग सांगीतले. मात्र शाह कुटुंबानी कुणाचेही न ऐकता मूलीने आतापर्यंत मूलाचे कर्तव्य पार पाडले तेव्हा आताही तीच ते कर्तव्य पार पाडेल असा निर्णय घेतला. त्यानुसार तिनेच मूखाग्नी दिला.
मुलगा नसलेल्या दाम्पत्यांच्यामुलींसमोर हा एक नवा आदर्शनिर्माण झाला आहे.
सासू असले म्हणून काय झाले, माझ्या सूनेच्या पाठीशी मी ख़बीरपणे उभी आहे व पूढेही राहील. शेवटी माणूसकीची नाते असते की, नाही