वेअर हाऊसला परवानगी देण्याच्या मोबदल्यात लाच भोवली

जळगाव : वेअर हाऊस बांधण्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी देत साडेसात हजार रुपये रक्कमेची लाच ग्रामसेवकाने तक्रारदाराकडे मागितली. तडजोडीअंती पाच हजाराची लाच घेताना पारगाव (ता. चोपडा) येथील ग्रामसेवक हेमचंद्र दत्तात्रय सोनवणे (३९) यांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. बुधवार ३१ रोजी ही कारवाई करण्यात आली. तक्रारदाराचे पारगाव शिवारात रे, शेत आहे.

या शेतात ते वेअर ीप हाऊस बांधत आहेत. यासाठी र, ग्रामपंचायतीची परवानगी लागत प. असते. त्यानुसार तक्रारदाराने दीड भा महिन्यापूर्वी ग्रामपंचायत कार्यालयात या अर्ज सादर केला होता. ग्रामसेवक व हेमचंद्र सोनवणे यांनी बांधकामाची परवानगी दिली. त्यानंतर अर्जदाराकडे प्रकरण मंजुरीच्या मोबदल्यात साडेसात हजाराची लाचेची मागणी केली. तडजोडअंती पाच हजार लाच देण्याचे निश्चित झाले. तक्रारदाराने याप्रकरणी एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार ३१ रोजी तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्विकारत असताना ग्रामसेवक सोनवणे यांना एसीबीच्या पथकाने पकडले व ताब्यात घेतले.

याप्रकरणी अडावद (ता.चोपडा) पोलीस ठाण्यात ग्रामसेवकाविरुध्द गुन्हा दाखल झाला. जळगाव अॅन्टी करप्शन ब्युरोचे पोलीस उपअधिक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनात सफौ दिनेशसिंग पाटील, पो.ना. बाळ मराठे, पोलीस शिपाई राकेश दुसानें यांनी सापळा रचत ही कारवाई केली. पथकाला पोनि. एन.एन. जाधव, सफौ सुरेश पाटील, पोह रवींद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर, पोना किशोर महाजन, पोकॉ प्रदीप पोळ, पोकॉ प्रणेश ठाकुर, पोलीस शिपाई अमोल सुर्यवंशी यांची मदत लाभली.

लाचेची मागणी केल्यास तत्काळ संपर्क साधा
कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेली मागणी केल्यास तत्काळ संपर्क साधावा असे आवाहन उपअधिक्षक अॅन्टी करप्शन ब्युरो जळगाव अल्पबचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय आवार जळगाव यांनी केले आहे