वैष्णो देवी : अवघ्या ३ दिवसांनंतर नवरात्रोत्सव सुरु होणार आहे.भाविक देवीच्या दर्शनासाठी जातात.अश्यातच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज श्री माता वैष्णो देवी मंदिराला भेट दिली आणि नूतनीकरण केलेल्या पार्वती भवन आणि स्काय वॉकचे उद्घाटन केले.राष्ट्रपती मुर्मू बुधवारी सकाळी श्रीनगरला पोहोचले आणि गुरुवारी मंदिराला भेट देतील आणि नूतनीकरण केलेल्या पार्वती भवन आणि स्कायवॉकचे उद्घाटन करतील. स्कायवॉकचे काम गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सुरू झाले.
पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, आयजीपी जम्मू यांनी अनेक महत्त्वाच्या बैठका घेतल्या आणि व्हीव्हीआयपी भेट आणि आगामी नवरात्रोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भवन आणि कटरा येथील पोलिस ठाण्यांना भेट दिली. प्रवक्त्याने सांगितले की, या बैठकांमध्ये जैन यांनी यात्रेच्या पार्श्वभूमीवर अधिक सावध राहण्यावर भर दिला आणि आगामी नवरात्रोत्सव लक्षात घेऊन सर्व अधिकारी आणि सैनिकांनी सुरक्षा उपायांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले.