शपथ घेतल्यानंतर 16 तासांनी पीएम मोदींनी पहिल्या फाईलवर केली सही, घेतला शेतकऱ्यांशी संबंधित मोठा निर्णय

ही फाइल पीएम किसान निधी सन्मान योजनेशी संबंधित आहे. पीएम किसान निधी सन्मान योजनेच्या १७ व्या हप्त्याशी संबंधित फाइलवर पंतप्रधान मोदींनी स्वाक्षरी केली आहे. या अंतर्गत सुमारे २० हजार कोटी रुपयांचे वाटप केले जाईल, ज्याचा फायदा देशातील ९.३ कोटी शेतकऱ्यांना होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर सुमारे १६ तासांनी त्यांनी या कार्यकाळातील पहिल्या फाइलवर स्वाक्षरी केली आहे.

ही फाइल पीएम किसान निधी सन्मान योजनेशी संबंधित आहे. पीएम किसान निधी सन्मान योजनेच्या १७ व्या हप्त्याशी संबंधित फाइलवर पंतप्रधान मोदींनी स्वाक्षरी केली आहे. या अंतर्गत सुमारे २० हजार कोटी रुपयांचे वाटप केले जाईल, ज्याचा फायदा देशातील ९.३ कोटी शेतकऱ्यांना होणार आहे.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आमचे सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पूर्णपणे समर्पित आहे. त्यामुळे स्वाक्षरी करण्यात येणारी पहिली फाईल ही शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित असावी, हे वाजवी होते. आगामी काळात शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी अधिकाधिक काम करण्याची आमची इच्छा आहे.

मोदी मंत्रिमंडळ ॲक्शन मोडमध्ये

तत्पूर्वी, पीएम मोदींनी सोमवारी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला. मोदी मंत्रिमंडळाने रविवारी शपथ घेतल्यानंतर सोमवारी दोन महत्त्वाचे निर्णय घेतले. हे दोन्ही निर्णय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घेण्यात आले आहेत. मोदी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत दोन कोटी अतिरिक्त घरांना मंजुरी देण्यात येणार आहे. त्याचवेळी, आणखी एका महत्त्वाच्या निर्णयानुसार, या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीत सुमारे ५० टक्के वाढ केली जाऊ शकते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. त्यांनी राष्ट्रपती भवनात आपल्या नवीन मंत्रिमंडळासोबत शपथ घेतली. मोदी सरकार ३.० मधील एकूण मंत्र्यांची संख्या ७२ आहे, त्यापैकी ३० मंत्री मंत्रिमंडळाचा भाग असतील. याशिवाय मंत्र्यांना स्वतंत्र प्रभार देण्यात आला आहे. त्याचबरोबर ३६ खासदारांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. अशा अनेक मंत्र्यांचा मोदी मंत्रिमंडळ ३.० मध्ये समावेश करण्यात आला आहे, जे मोदी सरकार २.० मध्ये देखील मंत्री होते.