दक्षिण आफ्रिकेत पहिली कसोटी मालिका जिंकण्यासाठी भारताला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची सेवा मिळणार नाही. बीसीसीआयच्या वैद्यकीय चमूने त्याला खेळण्याची परवानगी न दिल्यामुळे त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघातून वगळण्यात आले आहे, असे बीसीसीआयने जाहीर केले.नुकत्याच झालेल्या वन-डे विश्वचषक स्पर्धेदरम्यान शमीच्या घोट्याच्या दुखापत झाली होती. या दुखापतीतून बरे झालेल्या शमीचा यापूर्वी भारताच्या कसोटी संघात समावेश करण्यात आला होता, परंतु त्याची उपलब्धता त्याला बीसीसीआयच्या वैद्यकीय चमूकडून मंजुरी मिळण्याच्या अधीन होती.बीसीसीआयने शमीच्या जागी अन्य कोणात्याही खेळाडूची घोषणा केली नाही.
भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यान पहिला कसोटी क्रिकेट सामना २६ डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये खेळला जाणार आहे. या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय कसोटी संघाचे सदस्य २० डिसेंबरपासून तीन दिवसीय आंतर- मोहम्मद शमी दीपक चहर संघ सामना खेळणार आहे. मायदेशात इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी मोहम्मद शमी तंदुरुस्त होण्याची शक्यता आहे. हैदराबादमध्ये २५ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान तो पुनरागमन करू शकेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना ३ जानेवारी २०२४ पासून केपटाऊन येथे सुरु होणार आहे.दीपक चहरच्या जागी आकाश दीपला संधी कौटुंबिक कारणास्तव दक्षिण आफ्रिकेला जाण्यास असमर्थ असल्यामुळे वेगवान गोलंदाज दीपक चहरला सुद्धा भारताच्या एकदिवसीय क्रिकेट संघातून वगळण्यात आले. राष्ट्रीय निवड समितीने चहरच्या जागी वेगवान गोलंदाज आकाश दीपला संघात स्थान दिले आहे, असे बीसीसीआयने म्हटले आहे.