शरद पवारांचा सुनील शेळके यांना कडक शब्दांत इशारा, म्हणाले “जर पुन्हा असं केलं…”

लोणावळा : शरद पवारांच्या सभेला जाऊ नये म्हणून कार्यकर्त्यांना धमकावणाऱ्या आमदार सुनील शेळके यांचा शरद पवार यांनी कार्यकर्ता सभेत चांगलाच समाचार घेतला.लोणावळ्यातील कार्यकर्ता सभेत संबोधित करताना शरद पवारांनी आक्रमक भाषण करत सुनील शेळके यांच्यासह विरोधकांवर सडकून टीका केली.

सुनील शेळकेंना इशारा देताना शरद पवार म्हणाले, “तू आमदार कोणामुळं झाला, तुझ्या सभेला कोण आलं होतं? त्यावेळी तुझ्या पक्षाचा अध्यक्ष कोण होता? तुझ्या फॉर्म, चिन्ह यासाठी नेत्याची सही लागते ती सही माझी आहे. ज्यानं ही सही केलीए त्याचेच कार्यकर्ते तुम्हाला निवडून आणण्यासाठी राबले, घाम गाळला त्यांनाच आज तुम्ही दमदाटी करता.माझी तुम्हाला विनंती आहे की, एकदा तुम्ही दमदाटी केलीत आता बास्स, पुन्हा जर असं काही केलं तर शरद पवार म्हणतात मला… मी खरंतर तर या रस्त्यानं जात नाही पण जर या रस्त्यानं जाण्याची स्थिती कोणी निर्माण केली तर त्याला सोडतही नाही”