जळगाव : रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी (महाविकास आघाडी) शरद पवार पक्षाकडून भाजपमधून आलेले श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. दरम्यान, पक्षात कमालीची धुसफूस पाहायला मिळत आहे. या नाराजीनाट्यावर पडदा टाकण्यासाठी काल, २० रोजी गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे तळ ठोकून होते. पण कार्यकर्त्यांनी त्यांची जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आज 21 रोजी दस्तूरखुद्द शरद पवार हेच जळगावमध्ये सकाळीच दाखल झाले. शरद पवार यांचे जळगाव विमानतळावर रोहिणी खडसे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. आता पदाधिकाऱ्यांसोबत बंद द्वार बैठक सुरू असल्याचे कळते.