शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात तासभर चर्चा, राजकीय क्षेत्रात खळबळ

शरद पवार : राष्ट्रवादी काँग्रेसेच अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आता नुकतीच भेट झाली.ही भेट शरद पवार यांचे चुलत बंधू प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी ही भेट झाली.या भेटी बद्धल राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगल्याची पाहिला मिळत आहे.

महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा वेग आला आहे.शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज भेट झाली. पुण्यात बाणेरमध्ये शरद पवार यांचे चुलत बंधु प्रतापराव पवार यांचं निवासस्थान आहे. तिथे शरद पवार, अजित पवार आणि पवार कुटुंबातील अन्य सदस्य आले होते. अजित पवार या भेटीनंतर दिल्लीला रवाना झाले आहेत. प्रतापराव पवार यांच्या घरातून बाहेर पडल्यानंतर माध्यमांनी शरद पवार यांना गाठलं. शरद पवार यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी या भेटीबद्दल विचारलं, त्यावेळी ते म्हणाले की, “सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. नवीन वर्ष सुख, समृद्धी भरभराटीच जावो” अजित पवारांसोबत झालेली भेट कौटुंबिक होती, असं शरद पवार म्हणाले. अजित पवार यांच्या दिल्लीत दौऱ्याबद्दल बोलणं शरद पवार यांनी टाळलं. विशेष म्हणजे प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात तासभर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या सगळ्या प्रश्नांची उत्तर लवकरच मिळतील

अजित पवार या भेटीनंतर दिल्लीला रवाना झालेत. अजित पवार दिल्लीत अमित शाह यांना भेटणार असल्याची माहिती आहे. अजित पवार यांना डेंग्यु झाला होता. त्यामुळे मागच्या काही दिवसात ते दिसले नव्हेत. डॉक्टरांनी त्यांना सक्त विश्रांतीचा सल्ला दिला होता. आता अजित पवार अचानक दिल्लीला रवाना झाल्याने उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. अजित पवार नाराज असल्याची सुद्धा चर्चा आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात कौटुंबिक भेटीत काय चर्चा झाली? दिल्ली भेटीचा उद्देश काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तर लवकरच मिळतील. नुकत्याच झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत अजित पवार यांच्या गटाने शरद पवार गटापेक्षा जास्त ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला.