अहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्णय आयोगाने यापूर्वी दिला असून, गुरुवारी शरद पवार गटाला ‘तुतारी वाजविणारा माणूस’ हे पक्षचिन्ह देण्यात आले. पक्षाला तुतारी हे चिन्ह मिळाल्यानंतर रोहित पवार यांनी चारोळीतून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या चिन्हाचे स्वागत करताना आम्ही हातात मशाल व तुतारी घेऊन निवडणुका लढविणार असे महाविकास आघाडीच्या चिन्हांचे एकत्रित वर्णन केले आहे. रोहित पवार म्हणाले, होऊ एक घेऊ हातात हात खुशाल. पेटवू महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची मशाल. न डगमगता वाजवू क्रांतीची मशाल. गाडून टाकू महाराष्ट्रातून समूळ गद्दारी. असं ते म्हणाले.
यावरून भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आहे.‘मशाली घ्या, तुतारी घ्या, तुमचे स्वागत आहे. मात्र, तुतारी वाजेल की, नुसती हवा निघेल, हेही लवकरच कळेल. फार तर फार आम्ही तुम्हाला नवीन तुतारी घेऊन देऊ,’ अशी टिप्पणी सुजय पाटील यांनी केली.