Cholesterol: नुकत्याच झालेल्या एका आरोग्य सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की 10 पैकी 6 भारतीयांमध्ये कोलेस्टेरॉलची पातळी असामान्य आहे. कोलेस्टेरॉल हा चरबीचा एक प्रकार आहे. ज्याची शरीराला पेशी आणि हार्मोन्सच्या निर्मितीसाठी गरज असते. परंतु जेव्हा ते शरीरात जास्त प्रमाणात जमा होते तेव्हा समस्या उद्भवते. जास्त जंक फूड खाल्ल्याने रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात ज्यामुळे शरीरात रक्ताभिसरण नीट होत नाही. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
वाढलेल्या कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे व्यायाम करणे आणि खाण्याच्या सवयी बदलणे. अशा परिस्थितीत काही पदार्थांपासून दूर राहिल्यास कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
तळलेले पदार्थ पूर्ण बंद करा
तळलेल्या पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट्स असतात, जे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवून तुमच्या हृदयाशी संबंधित आजार वाढवू शकतात. त्याऐवजी, ओमेगा 3 फॅटी ऍसिड, मासे, फ्लेक्स सीड्स, अक्रोड यांसारख्या हेल्दी फॅट्सचे सेवन करा.
फुल फॅट डेअरी प्रोडक्टपासून दूर राहा
पूर्ण चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असते, जे थेट शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढवते. आणि जेव्हा खराब कोलेस्टेरॉल तुमच्या लिव्हरकडे जाते तेव्हा ते तुमच्या शरीरातून काही कोलेस्टेरॉल काढून टाकण्यास सक्षम असते. पण या सॅच्युरेटेड फॅटमुळे तुमच्या यकृतावर परिणाम होतो, ज्यामुळे ते खराब कोलेस्टेरॉल तेवढे कमी करू शकत नाही.