---Advertisement---

शासकीय लाभाचे आमिष; महिलांचा पक्षप्रवेश… जळगाव जिल्ह्यातील प्रकार 

by team
---Advertisement---

पाचोरा : येथील जनता वसाहत भागातील काही महिलांना शासकीय योजनेचे आमिष दाखवत पाचोरा नगरपालिका कार्यालयात येण्याचे आवाहन करण्यात आले होते. मोलमजुरी करून आपले कुटुंब सांभाळणाऱ्या या महिलांना त्यांची घरे नावावर लावून दिले जात असल्याचे सांगत नगरपालिकेचे शासकीय कार्यालय टाळून आमदार यांच्या घरी नेण्यात आले. येथे आलेल्या माता भगिनींना तुमचे घर तुमच्या नावावर लावून दिले जात आहे, असे सांगत उपस्थित माता-भगिनींच्या गळ्यात पक्षीय रुमाल टाकून फोटो सेशनही केले. दुसऱ्या दिवशी समाज माध्यम व वर्तमानपत्रात आपला पक्ष प्रवेश झाल्याचे कळाल्याने या महिला संतप्त झाल्या.

याबाबत संतप्त महिलांनी अमोल शिंदे यांच्या पत्नी पूजा शिंदे यांच्यासमोर आपली कैफियत मांडत आपली फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. या महिलांची विचारपूस करून पूजा शिंदे यांनी त्यांना धीर दिला. संतप्त महिलांनी उपस्थितांसमोर व्हिडिओ चित्रीकरण करून आपले फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. व आम्ही सदैव अमोल शिंदे यांच्या पाठीशीच उभे होतो आणि भविष्यात देखील राहू अशी ग्वाही महिलांनी यावेळी दिली तसेच या घटने संदर्भात पूजा शिंदे यांनी अशा पद्धतीने शासकीय कामाचा लाभ मिळवून देतो असे आमिष दाखवून पक्ष प्रवेश करून घेणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पाचोरा व भडगाव तालुक्यातील माता-भगिनींना केले आहे.

 

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment