शिंदखेडा: शिंदखेडा तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीची हत्या करण्यात आली होती मात्र हत्या करणाऱ्या संशयिताला पकडण्यात अद्याप यंत्रणेला यश आलेले नाही. या तरुणीची अपहरण केल्यानंतर हत्या करण्यात आली असून मारेकऱ्याचे नाव सांगणाऱ्यास ५० हजारांचे बक्षीस धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी जाहीर केले आहे.
आरोपीचे नाव सांगणाऱ्याचे नाव पोलीस प्रशासनाकडून गुप्त ठेवण्यात येणार असल्याचेही पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रात नमूद आहे. शिंदखेडा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन तरुणीचा खून तिला गोणपाटात भरून विरदेल गावशिवारातील दादरच्या शेतात फेकून देण्यात आले होते. पोलिसांनी आरोपींना तत्काळ अटक करून फास्टट्रॅक न्यायालयात केस चालवून आदिवासी समाजाला न्याय द्यावा,
या मागणीसाठी आदिवासी टायगर सेना व इतर आदिवासी संघटनांनी बुधवार, १४ रोजी दुपारी शिंदखेडा शहरात विराट मोर्चा काढण्यात आला होता. खूनाचा खटला फास्टट्रॅक न्यायालयातून न्याय मिळावा व आरोपीस त्वरित अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी होत होती.