मुंबई मध्ये गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार अशा चर्चा सुरू आहे.पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट करताना शिंदेच मुख्यमंत्री राहणार, असंही म्हटलं. त्यावर आज शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दादा भुसे म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाबाबतचे देवेंद्र फडणवीसांचं स्टेटमेंट ऐका. शिंदे हे मुख्यमंत्री राहतील. आगामी निवडणूक देखील त्यांच्या नेतृत्वाखाली होतील, असं ते म्हणाले आहे. तसही एकनाथ शिंदे हे जनतेच्या मनातले मुख्यमंत्री आहेत, असा दावाही भुसे यांनी केला आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की,याबाबत निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतात. त्याच्या निर्णयाचे आम्ही पालन करतो.
शिवाय भुजबळ आणि महाजन यांचे मार्गदर्शन घेतो. पालकमंत्रीपदाचा निर्णय मुख्यमंत्री यांचा असल्याचही त्यांनी नमूद केलं.लोकसभा निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले की,निवडणुकांची तयारी प्रत्येक पक्ष करत असतो. पक्ष कुठलाही असो ते त्यांचे काम करत असतो. महायुतीचे मिशन 45 पूर्ण करू, असा दावाही त्यांनी केला.