जळगाव जिल्ह्यातील या ‘आमदाराची’ शिंदे-फडणवीस सरकारमध्ये लागणार वर्णी ?

मुंबई : बहुप्रतिक्षीत राज्यातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चेला आज विराम मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठी वाढल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मंत्रिमंडळ विस्तरात पारोळा आमदार चिमणराव पाटील यांना देखील मंत्रीमंडळात स्थान दिले जाईल अशी शक्यात वर्तविण्यात येत आहे.

 

त्यांनी शुक्रवारी नागपूर दौर्‍यानंतर लागलीच रात्रीतून दिल्लीकडे प्रयाण केले होते. ते सकाळी पुन्हा महाराष्ट्रात दाखल झाले असल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे.उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तराबाबतची चर्चा करण्यासाठी काल रात्री दिल्ली वारी केल्याची माहिती समोर आली आहे.

उपमुख्यमंत्र्याच्या तातडीच्या दिल्लीवारी मागे मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चेला उधाण आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात भेटीगाठींना वेग दिला आहे. जयकुमार गोर्‍हे व राहुल कुल हे देखील भेटीसाठी आले आहेत. कॉंग्रेसचे निलंबित नेते आशिष देशमुख यांच्या घरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेटीसाठी गेले आहेत.

शिंदे-फडणवीस सरकार वर्ष पूर्ण केले तरी देखील दुसर्‍या टप्यातील मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. दरम्यान, राज्यातील सत्तसंघर्षाचा निकाल देखील लागला आहे. यानंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत होत. या आगामी मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील ८ आमदारांना मंत्रीपदाची जबाबदारी दिली जाईल अशी चर्चा रंगली आहे.