महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी मतदार असलेल्या शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी 26 जून, 2024 रोजी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे,
जळगाव : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदार असलेल्या शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावत यावा याकरिता बुधवार, 26 जून रोजी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे, असे उपायुक्त विठ्ठल सोनवणे यांनी कळविले आहे.
नाशिक शिक्षक मतदार संघासाठी 26 जून रोजी सकाळी 7 ते सायंकाळ 6 या वेळेत मतदान होणार आहे.
निवडणुकीसाठी मतदान करण्याकरीता मतदाराकडे निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या तेरापैकी कोणतेही एक छायाचित्र असलेले ओळखपत्र असणे आवश्यक आहे. त्यानुसार मतदानासाठी नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष व संबंधित कर्मचाऱ्यांनी मतदार ओळखपत्र तपासण्याची दक्षता घ्यावी, असे निर्देश नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा नाशिक विभागाचे विभागीय उपायुक्त विठ्ठल सोनवणे यांनी दिले. या सोबतच सर्व शिक्षक मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी त्यांना विशेष नैमत्तिक रजा मंजूर करावी, अशाही सूचना त्यांनी दिल्या.
जळगाव जिल्ह्यातील फक्त शिक्षक मतदारांसाठी पुढील प्रमाणे मतदान केंद्र आहेत. यात तहसिल कार्यालय चोपडा, तहसिल कार्यालय यावल नवीन तहसिल कार्यालय रावेर, तहसिल कार्यालय मुक्ताईनगर, तहसिल कार्यालय बोदवड, डी.एस. हायस्कूल, भुसावळ, डी.एस. हायस्कूल, भुसावळ, आर. आर. विद्यालय, जळगाव, आर. आर. विद्यालय, जळगाव, भाऊसाहेब काशिनाथ लाठी विद्यामंदीर जळगाव, तहसिल कार्यालय, धरणगाव, तहसिल कार्यालय अमळनेर, राजसारथी सभागृह, तहसिल कार्यालयाजवळ अमळनेर, तहसिल कार्यालय, पारोळा,तहसिल कार्यालय, एरंडोल,तहसिल कार्यालय, भडगाव, नानासाहेब वाय. एन. चव्हाण कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, चाळीसगाव, नानासाहेब वाय. एन. चव्हाण कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, चाळीसगाव, तहसिल कार्यालय, पाचोरा, जि. प. प्राथमिक शाळा वाकी रोड जामनेर या मतदान केंद्रांचा समावेश आहे.