समाजातल्या आर्थिकदृष्ट्या मागास गटासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या अंतर्गत गरीब व गरजू लोकांना अत्यंत कमी दरात रेशन उपलब्ध केले जाते. भारत सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. या बाबतची माहिती जाणून घेऊया.
सरकारच्या नवीन नियमांनुसार, सर्व शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी (इलेक्ट्रॉनिक-नाव, पत्ता, इ.) प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली असून, ई-केवायसीसाठी ३१ ऑक्टोबर २०२४ ही अंतिम तारीख ठरवली आहे. यानंतर, १ नोव्हेंबरपासून ई-केवायसी प्रक्रिया न करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना रेशन मिळणार नाही. त्यांची नावे शिधापत्रिकेतून वगळण्यात येतील आणि त्यांना सरकारी रेशन योजनेचा लाभ बंद करण्यात येईल.
ई-केवायसी कसे करावे?
शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या जवळच्या अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. या प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे आणि माहिती उपस्थित असणे आवश्यक आहे. त्यामुळे, आपल्या शिधापत्रिकेची अद्ययावत स्थिती आणि पात्रता सुनिश्चित करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपूर्वी ई-केवायसी पूर्ण करणे महत्वाचे आहे.