पुणे : राज्यात काही दिवसांतच लोकसभा निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. शिंदे गटाचे नेते आढळाराव पाटील आता राष्ट्रवादीत प्रवेश घेणार आहे.त्यामुळे शिरुर लोकसभेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीचा घड्याळ चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढणार आहे.
आढळराव पाटील अजित पवार गटात प्रवेश कऱणार असल्याने आता आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे अशी तगडी लढत बघायला मिळणार आहे. त्यामुळे बारामती नंतर आता शिरुर लोकसभा मतदार संघाकडेही महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांचं लक्ष असणार आहे.