जळगाव : शिव भक्तीत लीन व्हा, सगळे सुख आपोआप आपल्याला प्राप्त होतील. भगवान महादेव न मागता सर्व काही भक्तांना देतात असा भाविकांना संदेश देत त्यांनी अध्यात्मातूनच सनातन धर्माला बळ मिळते. त्यासाठी धर्म परिवर्तन करू नका, आपत्या सनातन धर्मातच रहा, ज्यांनी धर्म परिवर्तन केले, ते चोर कुठेही गेले तरी चोरच राहणार असे निरूपण शिव महापुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी केते. जळगाव शहरापासून जवळच असलेल्या बड़े जटाधारी महादेव मंदिर परिसरातील वडनेरी फाटा याठिकाणी मंगळवारी आयोजित विराट शिवप्राण कथा सोहळ्यात ते बोलत होते. हजारो नव्हे तर लाखो मुखातून श्री शिवाय नमःत्सुम्यमचा हुंकार आसमंतात घुमत असल्याचे दृश्य या ठिकाणी दिसून आले.
नम्रता कधीही सोडू नका
शिवमहापुराण कथा श्रवण केल्याने तुमच्या जीवनात आपोआपच आनंद व ऊर्जा प्राप्त होईल जीवनाचा मार्ग सापडेल. नम्रता कधीही सोडू नका, सुंदरतेपेक्षा नम्रतेला खूप महत्व आहे मुलांच्या जीवनात माता-पित्यांचे खूप महत्व आहे. कारण माता-पिता मुलांना संस्कार देण्याचे महत्वाचे कार्य करीत असतात. चांगले अन वाईट काय? यावर अंकुश ठेवण्याचे काम ते करीत असतात. त्यांची भूमिका मुलांच्या जीवनात अनमोल असल्याचे त्यांनी सांगितले. सासू-सुन यांच्या नात्यात गोडवा कायम ठेवा जेणेकरून संसाराचा गाडा सुरळीत चालेल. दोघांनीही मोठेपणाचा बडेजाव न करता शिव भक्तीत मन गुंतविण्याचे आवाहन पंडित प्रदीप मिश्रा यांनी केले. परमेश्वर प्राप्तीसाठी मोठे होण्याची गरज नाही हृदयापासून शिवभक्ती करा, महादेव तुमची हाक ऐकल्याशिवाय राहणार असेही त्यांनी सांगितले.
विधवा नारीही करू शकते भगवान शंकराचे पूजन
भगवान शंकराचे पूजन विधवा नारीही कर शकते. कोणत्याही पुराणात नोंद आढळत नाही की, भगवान शंकराची पूजा विधवा महिलेने करू नये त्यामुळे विधवा महिलांनी शिव आराधना करण्याचे आवाहन पंडित मिश्रा यांनी केले. भगवान शंकराचे मंदिर जुने असो की नवे. मनापासून श्रध्दा ठेवून भक्तत्र करा, भोलेनाथ तुमची मनोकामना नक्की पूर्ण करतील, असे त्यांनी सांगितले.
भजनांवर भाविकांनी धरला ताल
पंडित मिश्रा यांनी झुठा है संसार धोका खाएगा, करले प्रभूसे प्यार फिर पछताएगा। या भजनांवर भाविकांनी ताल धरला. शिव भक्तांनी या भजनावर मंडपात ताल धरता, उपस्थित सर्वच या भजनात लीन झाले. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या महाशिवपुराण कयेचे आस्था या चॅनलवरून लाईव्ह प्रसारण दुपारी २ ते ५ दरम्यान होत आहे. असंख्य भाविक या माध्यमातून कयेचा लाभ घेत आहेत. तसेच आयोजकांसह रस्त्यांने भाविकांसाठी पाणी व नाष्ट्याचे स्टॉल लावणाऱ्या दानशुरांचे पंडित मिश्रा यांनी विशेष कौतुक केले.
लहान व्यावसायिकांकडून वस्तू खरेदी करा
भारताच्या प्रगतीसाठी आपण मोठ्यणे मॉल व व्यावसायिकांना प्राधान्य देण्याऐवजी गावातील व परिसरातील लहान व्यापा-यांकडून वस्तू खरेदी करा. ज्यामुळे गावातीत व्यापाऱ्यांच्या व्यवसायात वृध्दी होईल मोठमोठ्या मॉलमध्ये अधिकच्या दराने आपली फसवणूक होते त्यामुळे आपल्या नगरातील लहान व्यावसायिकांकडून वस्तू खरेदी करण्याचे आवाहन पंडित प्रदीप मिश्रा यांनी केले. विद्या अध्ययन, दान, भजन आणि शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी कधीही थकवा येऊ देऊ नका, असेही ते म्हणाले. शिवमंदिरात दान करताना कोणाकडून पैसे घेऊन दान करू नका, स्वतःच्या खिशातूनच दान करावे, असेही त्यांनी सांगितले.
शिवभक्तांच्या सुपुत्रांनी इतिहास घडविला
राजमाता जिजाऊ आणि अहिल्याबाई होळकर शिवभक्त होत्या त्याअनुषंगानेच जिजामाता यांनी त्यांच्या सुपुत्राचे नावही छत्रपती शिवाजी होते. ज्यांनी स्वराज्याची स्थापना करून इतिहास घडविला. हर हर महादेवांच्या घोषणेने छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांना ऊर्जा मिळत होती. त्याचप्रमाणे हिंदुहृदय सम्राट स्व बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात सनातन धर्मासाठी मोठे योगदान दिले. स्वामी विवेकानंद यांनीही विदेशात जाऊन सनातन धर्माचा प्रचार व प्रसार केल्याचे पंडित मिश्रा यांनी सांगितले. आम्ही कुणाचा धर्म बदलविण्यासाठी आलेलो नाही तर सनातन धर्म मजबूत करण्यासाठी आलो आहे. सनातन धर्माचा ध्वज घेऊन चालायचे असल्याचेही ते यावेळी म्हणाले.