शिवमहापुराण कथेत दीड लाखाचे दागिने लांबविले; 4 संशयित ताब्यात

जळगाव :  शहराजवळील बडे जटेधारी महादेव मंदिर परिसरात मंगळवार, 5 पासून सुरू झालेल्या पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेत गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी तब्बल महिलांचे सुमारे दीड लाखाहून अधिक किमतीचे  सोन्याचे दागिने लंपास केले. बुधवार, 6 रोजी पोलिसांच्या पथकांनी कथास्थळ परिसरात चार संशयित महिलांना ताब्यात घेतले. यामुळे संशयित महिलांना ताब्यात घेण्याची संख्या 32 झाली असून दोन संशयित पुरुषदेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. 26 संशयित महिलांना शनिवार, 9 पर्यंत आज न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. अटक केलेल्यांमध्ये मध्यप्रदेशातील एका गावातील तब्बल 13 संशयित एकाच गावातील आहेत. बुधवारी ताब्यात घेतलेल्यांमध्ये अलाहाबाद येथील तीन महिला व इंदूर येथील महिलेचा समावेश आहे.  यांचे गेले दागिने- हेमलता प्रकाश भावसार  यांची 36 हजार किमतीची 12 ग्रॅम वजनाची पोत, सरोज पुरुषोत्तम जोशी  यांची 39 हजार किमतीची 13 ग्रॅम वजनाची मंगलपोत,  मंगलाबाई प्रकाश कोळी