शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालावर गिरीश महाजन म्हणतात….

मुंबई । आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल शिंदे गटाच्या पारड्यात पडला असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं, मात्र खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. एकंदरीत शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्याने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. या निकालानंतर विरोधकांनी भाजप आणि नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. यातच राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले मंत्री महाजन?
लोकशाहीमध्ये आकडेवारीला महत्त्व असतं. एकनाथ शिंदे यांच्याकडे जास्त आमदार आहेत. सर्व नियमाने चालणार आहे. शिवसेनेचा विश्वास निवडणूक आयोगावर नाही. त्यांचा विश्वास मत पेट्यांवर तो उच्च न्यायालयावर नाही. सुरुवातीला देखील निवडणूक आयोगाने हाच निर्णय दिला होता, पक्षाचे नाव चिन्ह सुद्धा एकनाथ शिंदेंकडे दिले होते त्यामुळे निकाल अपेक्षित असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

निर्णय विरोधात गेला की वाटेल तसं बोलायचं. आजचा निर्णय हा सर्वसामान्य लोकांना अपेक्षित होता. ठाकरे गटाचे आमदारांना अपात्र केलं नाही त्यामुळे ठाकरे गटांनी या निर्णयाचा स्वागत केले पाहिजे ते सोडून अध्यक्ष आणि चुकीचा निर्णय दिला. आमच्या मनासारखा निर्णय झाला नाही म्हणून निर्लज्जपणाचा कळस झाला असे त्यांचे म्हणणे आहे, असं महाजन म्हणाले.