पाचोरा : आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठातर्फे शेतकरी शिवसंवाद यात्रा सुरु आहे. या यात्रेदरम्यान, पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघांत वैशाली सुर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गावा गावांमधील शेकडो कार्यकर्ते शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेत आहेत. यात महिला, तरुणांचा समावेश आहे.
शिवसेना उबाठा गटातर्फे शेतकरी शिवसंवाद यात्रा सुरू असून यात शेकडो तरूण व महिलांनी प्रवेश घेतला होता. यानंतर शुक्रवारी रात्री भडगाव तालुक्यातील कनाशीसह परिसरातील कनाशी, चिंचपूरे, सार्वे, नालबंदी तांडा, पांढरद आणि बोदर्डे या सहा गावातील कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. या सर्वांचे वैशाली सुर्यवंशी यांनी स्वागत करत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत प्रलोभनाला बळी न पडता तयार राहावे असे आवाहन वैशाली सूर्यवंशी यांनी केले यांनी केले आहे.
या प्रवेश सोहळ्याला दीपक पाटील, जे.के. पाटील, योजना पाटील, डी. डी. पाटील, बाळू पाटील, राजू पाटील, उध्दव मराठे, अरूण पाटील, शरद पाटील, अभय पाटील, गणेश परदेशी, मच्छींद्र पाटील, मनोहर चौधरी, भैय्या पाटील, शंकर पाटील, चंद्रशेखर चव्हाण, नंदू पाटील, शरद पाटील, प्रदीप पाटील, ज्ञानेश्वर पाटील, संतोष पाटील, निखील भुसारे, शशी बोरसे, भैय्या सुर्यवंशी आदींसह शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे, युवासेना, युवती सेना, महिला आघाडी तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.