पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा दिल्लीत पंतप्रधान पदाची शपथ घेणार असून यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात महायुतीकडन बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुंबई भारतीय जनता पक्षाकडून लावण्यात आलेल्या या बॅनर्सवर नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचा फोटो आहे.
भाजप नेते नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत. लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नाही. परंतु राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर येत आहेत. यामुळे महाराष्ट्रात भाजपचा विरोधक झालेला शिवसेना उबाठाला डिवचण्याचे काम भाजपने सुरु केले आहे. भाजपकडून सरळ शिवसेना भवनासमोर बॅनर्स लावले आहेत. ‘मोदी ओरिजनल ब्रँड’, अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे. त्यामाध्यमातून उद्धव ठाकरे आणि शिवसेना उबाठाला डिवचण्याचा पर्यत्न केले गेला आहे.
महाविकास आघाडीसह उद्धव ठाकरे यांना डिवचले
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा दिल्लीत पंतप्रधान पदाची शपथ घेणार असून यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात महायुतीकडन बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुंबई भारतीय जनता पक्षाकडून लावण्यात आलेल्या या बॅनर्सवर नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचा फोटो आहे. शिवसेना भवन परिसरात भाजपने बॅनरबाजी केली आहे. त्यावर मोदी ओरिजनल ब्रँड असे लिहिले आहे. शिवसेना भवन परिसरात मोदींच्या बॅनरबाजीतून महाविकास आघाडीसह उद्धव ठाकरे यांना डिवचले जात आहे.